Ladki Bahin Yojana Update : सर्वात मोठी बातमी! या महिलांना मिळाले 500 रुपये, पण या महिलांना थेट 4500 रुपये

Ladki Bahin Yojana News In Hindi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार गरीब कुटुंबातील महिलांना 1500 रुपये महिना देत आहे आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत 2 कोटी 41 लाख महिलांना जुलै ते मार्च पर्यंतचे पैसे दिलेले आहेत आणि 2 मे 2025 पासून या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता पण महिलांच्या खात्यात जमा करण्यात सुरुवात झाली आहे.

अशातच अनेक महिलांच्या खात्यात 1500 रुपये तर काही महिलांच्या खात्यात थेट 4500 हजार रुपये आणि काही महिलांच्या खात्यात फक्त 500 रुपये जमा झालेले आहेत तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

Ladki Bahin Yojana 10th installment

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात 2 मे 2025 पासून या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्यास सुरुवात झालेली आहे ही प्रक्रिया दोन मे पासून पुढील दोन ते तीन दिवस चालणार आहे आणि या कालावधीमध्ये सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.

या महिलांना मिळाले 500 रुपये

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे त्यामध्ये आतापर्यंत 1 कोटी पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा पण झालेले आहेत परंतु त्यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात फक्त 500 रुपये जमा झाले आहेत.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिला किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी आहेत अशा महिलांना या योजनेअंतर्गत फक्त 500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत.

हे पण वाचा : 10 वी क़िस्त जमा नहीं हुई। ऐसे चेक करें अपना पेमेंट स्टेटस सिर्फ 2 मिनट में

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

पण या महिलांना मिळाले थेट 4500 रुपये

महाराष्ट्र सरकारने मार्च महिन्यामध्ये महिला दिवसाचे निमित्त साधून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात फरवरी आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणे हप्ता जमा केला होता परंतु त्यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात एप्रिल आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नव्हता. अशा सर्व महिलांच्या खात्यात महाराष्ट्र सरकारकडून 2 मे 2025 पासून थेट 4500 हजार रुपये जमा करण्यात येत आहे.

Leave a Comment