Ladki Bahin Yojana Update : ७ वा हप्ता या महिलांना मिळणार नाही, सरकारने घेतला मोठा निर्णय

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana Update News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना राज्य सरकार 1500 रुपये महिना देत आहे या योजनेचा लाभ महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील व त्यांना प्रत्येक अडचणीचा सामना करावा लागू नये या मुख्य उद्देशाने सरकारने हि योजना लागू आहे.

सरकारने काही दिवसा अगोदर या योजनेचा सहावा हप्ता 2 कोटी 47 लाख महिलांच्या खात्यात जमा केलेला आहे परंतु अशातच आता राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा सातवा हप्ता मिळणार नाही कारण ह्या संदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे तर सरकार कोणते पाऊल उचलणार आहे आणि का ? लाखो महिलांना या योजनेअंतर्गत सातवा हप्ता मिळणार नाही ? या ( Ladki Bahin Yojana Update ) संदर्भात सर्व माहिती आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत.

Ladki Bahin Yojana Update Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थी2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला
आर्थिक मदत1500 रुपये महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 ऑक्टोबर 2024
हेल्पलाइन नंबर181
Ladki Bahin Yojana Website Linkhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/

लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी होणार

महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजनेच्या मंजूर अर्जाची पडताळणी करणार असल्याची बातमी समोर येत आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार राज्य सरकारकडे 2 कोटी 59 लाख महिलांची अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यामधील 2 कोटी 58 लाख महिलां पात्र ठरलेले आहेत परंतु एवढ्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी कसे आहे असा प्रश्न सरकार पडताळण्याच्या तयारीत आहे अर्जासंबंधीत सरकारकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या अनुषंगाने लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची फेर पडताळणी करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सध्याच्या संख्येनुसार सरकारला प्रत्येकी महिलांना दीड हजार रुपये देण्यासाठी दर वर्षी 46000 कोटी रुपये लागणार आहेत तर आता सरकार लवकरच 2100 रुपये देण्याचा निर्णय घेणार आहे त्यासाठी सरकारला दरवर्षी 65 हजार कोटी रुपये लागणार आहेत त्यामुळे तिजोरीची सध्या स्थिती पाहता एवढा निधी उभारायचं कसा असा प्रश्न सरकार समोर पडलेला आहे.

वित्त विभागातील काही अधिकाऱ्यांनी यासंदर्भात चिंता व्यक्त केलेली आहे या बाबीवर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या निष्काळसाची पडताळणी होईल असे सांगितले जात आहे.

हे पण वाचा : आनंदाची बातमी 2100 रुपये ह्या दिवशी जमा होणार, तारीख ठरली नवीन वर्षात सरकार देणार मोठी भेट

या महिलांना योजनेतून वगळण्यात येणार

महाराष्ट्र सरकारकडे लाडकी बहीण योजने संदर्भात जर तक्रारी आल्या तर सरकारकडून अशा अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.

  • महिलांच्या कुटुंबाच्या नावे दोन हेक्टर पेक्षा अधिक शेत जमीन नसावे
  • लाभार्थी लाडक्या बहिणींच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे
  • लाभार्थी महिला केंद्र किंवा राज्य सरकारच्या दुसऱ्या आर्थिक सहायता योजनेची लाभार्थी नसावी
  • कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेला नसावा
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा अधिक नसावी
Ladki Bahin Yojana Update
Ladki Bahin Yojana Update

जर वरील निकषांमध्ये जे लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला बसणार नाहीत अशा महिलांना सरकार या योजनेतून वगळणार आहे. परंतु जे महिला योजनेच्या निकषांमध्ये बसतील अशा महिलांना या योजनेअंतर्गत कायम लाभ देण्यात येणार आहे आणि सरकारने अजून अर्जाची सरसकट पडताळणी करण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही.

1 thought on “Ladki Bahin Yojana Update : ७ वा हप्ता या महिलांना मिळणार नाही, सरकारने घेतला मोठा निर्णय”

Leave a Comment