Ladki Bahin Yojana Registration 2025 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना महाराष्ट्र सरकार 1500 रुपये महिना देत आहे लवकरच या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना दिला जाणार आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचे पालन पोषण करू शकणार व त्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने हि योजना 28 जून 2024 रोजी लागू केली आहे.
आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत 2 कोटी 47 लाख महिलांना लाभ दिलेला आहे परंतु अशातच अनेक महिलांचे अर्ज तांत्रिक अडचणीमुळे व त्रुटीमुळे कायमस्वरूपी रद्द झालेली आहे तर काही महिलांना योजनेची योग्य प्रकारे माहिती न मिळाल्यामुळे त्यांनी या योजनेसाठी अर्ज केले नाही अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे लाडकी पण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी सरकार या नवीन वर्षा देणार आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
Ladki Bahin Yojana Registration 2025 Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | गरीब कुटुंबातील महिला |
आर्थिक मदत | 1500 रुपये महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन व ऑफलाइन |
Ladki Bahin Yojana Website Maharashtra | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
Ladki Bahin Yojana Registration 3.0 Document
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यासाठी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे त्याची माहिती खालील प्रमाणे आम्ही दिलेली आहे.
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- अधिवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान कार्ड, जन्म दाखला ( यापैकी कोणतेही पंधरा वर्षे पूर्ण झालेले कागतपत्र सादर करावे लागेल )
- हमीपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा राशन कार्ड ( पिवळा किंवा केसरी रंगाचे असणे आवश्यक )
- पासपोर्ट साईज फोटो
- लाडकी बहीण योजनेचा अर्ज
Ladki Bahin Yojana Registration 3.0 Eligibility
- अर्जदार महिलाही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे
- महिलांच्या नावे स्वतःची बँक खाते असणे आवश्यक
- महिला इतर शासनाच्या कोणत्याही आर्थिक योजनेची लाभार्थी नसावी
- महिला जर शासकीय नोकरीवर असेल तर ती महिला या योजनेसाठी पात्र नाही
- महिलांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावे चार चाकी वाहन असेल ती महिला योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही
- महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे
Ladki Bahin Yojana Registration 2025
महाराष्ट्र सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना सुरुवातीला 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 हे वेळ दिलेली होती व त्याचप्रमाणे राज्यातील कोणतीहि महिला या योजनेपासून वंचित राहू नये त्याकरता सरकारने योजनेच्या कालावधीमध्ये पुन्हा वाढ करून 15 ऑक्टोबर 2024 ठेवली
या कालावधीमध्ये दोन कोटी पेक्षा अधिक महिलांनी अर्ज सादर केले व त्यांना या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्यापर्यंत पैसे सरकारने दिले परंतु अनेक महिलांचे अर्ज काही त्रुटी संदर्भात रद्द करण्यात आले व त्याचप्रमाणे काही महिला योजनेची माहिती योग्य प्रकारे न मिळाल्यामुळे त्या महिला योजनेपासून वंचित राहिल्या
मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार आहे सरकार मार्च महिन्यानंतर या योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया सुरू करून अशा वंचित महिलांना पुन्हा एकदा संधी देणार आहे.
Ladki Bahin Yojana Online Apply 2025 Link

FAQ – Ladki Bahin Yojana Registration 2025
Ladki Bahin Yojana Online Apply Link 2025
लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता कधी जमा होणार
लाडकी बहीण योजने चा ७ वा हप्ता १ ५ ते २ ० जानेवारी पर्यंत जमा होण्याची शक्यता आहे

नमस्कार, मैं चंद्रकांत हूं, पिछले 10 वर्षों से ब्लॉगिंग और यूट्यूब के माध्यम से सरकारी योजनाओं की जानकारी देता आ रहा हूं, इसलिए आपकी लाडकी बहीण योजना की वेबसाइट के माध्यम से आपको जो भी जानकारी दी जा रही है, वह ध्यानपूर्वक दी जा रही है।