Ladki Bahin Maharashtra 7th Installment News In Marathi : राज्यातील महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केले आहे या योजनेच्या माध्यमातून 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना सरकार 1500 रुपये महिना दिला जात आहे या योजनेचा लाभ घेऊ महिला आपल्या कुटुंबाचा योग्य प्रकारे सांभाळ करू शकतील व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने ही योजना सरकारने सुरू केलेली आहे.
आतापर्यंत सरकारने या योजनेची सहा महिन्याची पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत आता महिला या योजनेच्या जानेवारी महिन्याच्या पैशाची वाट पाहत आहेत अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून जानेवारी महिन्याचा लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केलेली आहे व त्याचप्रमाणे अनेक महिलांना लाभ मिळणार नाही अशी पण माहिती समोर येत आहे तर आज आपण या ( Ladki Bahin Maharashtra 7th Installment ) संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
Ladki Bahin Maharashtra 7th Installment Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
योजनेची अंमलबजावणी | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | महिला व बालकल्याण विभाग |
लाभार्थी | गरीब कुटुंबातील महिला |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज करण्याची सुरुवात | 1 जुलै 2024 |
Ladki Bahin Yojana 3.0 Registration Link | Click Here |
हेल्पलाइन नंबर | 181 |
About Ladki Bahin Yojana Maharashtra
महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना 1500 रुपये महिना देण्याचा निर्णय घेण्यात आला या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली त्यासाठी महिलांना 1 जुलै 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज करण्याचे संधी दिली होती या कालावधीमध्ये 3 कोटीच्या जवळपास ऑनलाईन ऑफलाइन अर्ज सरकारकडे प्राप्त झाले.
त्यामधील सरकारने दोन कोटी 47 लाख महिलांना लाभ दिलेला आहे आणि सरकारने डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या योजनेचा सहावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेला आहे
Ladki Bahin Maharashtra 7th Installment
राज्यातील महिला लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहत आहे अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता महिलांना देण्यासाठी 3690 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून 26 जानेवारी अगोदर महिलांच्या खात्यात सातवा हप्ता जमा केला जाणारा अशी माहिती त्यांनी दिली होती त्यामुळे महिलांच्या खात्यात पुढील एक ते दोन दिवसात मध्ये या योजनेचा लाभ सरकारकडून जमा केला जाणार आहे.
या महिला राहणार सातव्या हफ्त्यापासून वंचित
महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना 1500 रुपये महिना दिला जात आहे आतापर्यंत सरकारने डिसेंबर महिन्यापर्यंत पैसे दिलेले आहेत परंतु मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने महिला व बाल विकास विभागाला लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची फेर पडताळणीची निर्देश दिले होते त्यानुसार महिला व बाल विकास विभागाने लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची फेरफडताळणी केली आहे.

त्यामध्ये 60 लाख पेक्षा अधिक महिला अपात्र असल्याचे समोर आलेले आहेत त्यामुळे जानेवारीचा हप्ता ज्या महिला या योजनेच्या निकषात बसणार नाहीत त्या मिळणार नाही अशी माहिती समोर येत आहे.
हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया सुरू, वंचित महिलांसाठी पुन्हा एकदा संधी
या महिलांच्या खात्यात जमा झाले 1500 रुपये
राज्यातील 2 कोटी 47 लाख महिला लाडकी बहीण योजनेच्या सातव्या अत्याची आतुरतेने वाट पाहत आहे अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून पहिल्या टप्प्यामध्ये आजपासून पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे पुढील एक ते दोन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात या योजनेचा लाभ जमा होणार आहे.